Jeevanacha Sohala Lyrics in Marathi – AB Aani CD

Jeevanacha Sohala Lyrics

Jeevanacha Sohala Lyrics in Marathi from movie AB Aani CD sung by Devki Pandit. Jeevanacha Sohala song Lyrics written by Vaibhav Joshi.

Jeevanacha Sohala Lyrics in Marathi ( जीवनाचा सोहळा )

विसर आता मोह सारे  
विसर तू साऱ्या झळा 
हसून कर साजरा हा जीवनाचा सोहळा  
जीवनाचा सोहळा 
 
आजच्या वर तू उद्याचा लाव पाहू चेहरा  
कालच्या जाचातुनी कर आरशाला मोकळा  
जीवनाचा सोहळा 
 
आतले स्वछंद गाणे येउदे ओठांवरी  
तो खरा आवाज जो गर्दीत वाटे वेगळा  
जीवनाचा सोहळा 
 
आपले दिसतात सारे आपले असतात हि  
ठेव ना विश्वास तर सहवास होतो सोहळा  
जीवनाचा सोहळा 

Read Also: Ali mili gup chili serial title song Marathi lyrics अळिंमिळी गुपचिळी- Zee Marathi